केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी २०२३ परिक्षेसाठी अधिकृत अधिसुचना जाहीर केली आहे. यूपीएससी एनडीए/ एनए नोटिफिकेशन आयोगाने अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. जे तरुण या भरतीसाठी इच्छूक आहे ते आयोगाच्या अधिकृक संकेत स्थळाला भेट देऊ ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवा ६ जून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीची परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोग ३ सप्टेंबरला एनडीए/एनए २ परिक्षा २०२३ आयोजित करणार आहे ज्यामध्ये १५२ व्या कोर्ससाठी एनडीएच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखेमध्ये प्रवेश मिळेल आणि २ जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या ११४व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रम अंतर्गत परिक्षा आयोजित केली जाईल.
