Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीएकीकडे TV सुरु तर दुसरीकडे बायोलॉजीचा पेपर

एकीकडे TV सुरु तर दुसरीकडे बायोलॉजीचा पेपर

सध्या बिहारमधील एक मजेदार आणि तितकाच धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही मुलं परीक्षा देताना दिसत आहेत आणि त्याचवेळी वर्गात टीव्हीवर पवन सिंगचे गाणे लावल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओने बिहारच्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुलं पेपर लिहित असताना वर्गात एकही शिक्षक उपस्थित नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे.          व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुलं वर्गात पेपर लिहिताना दिसत आहेत. या दरम्यान टीव्हीवर सुरु असलेल्या गाण्याचा आनंद घेणारी इतर मुलंही दिसत आहेत. तर कोही मुलं या घटनेचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओतील विद्यार्थी ८ मे २०२३ रोजी इयत्ता ११ वीचा बायोलॉजी विषयाचा पेपर लिहित होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची बाब जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी इस्लामपूर गटाच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवली. तसेच अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments