यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्यात तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. तर मे महिन्याच्या अंतिम आठवड्यापासून लेखी परिक्षांना सुरुवात होणार आहे. मे २०२३ उन्हाळी सत्र परीक्षेबाबत मुक्त विद्यापीठाने सूचनापत्र जारी केलेले आहे. यामध्ये परीक्षेतील महत्त्वाच्या टप्यांची माहिती दिलेली आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट, वर्कबूक, इंटर्नशिप, स्टुडिओ टर्मवर्क, स्टुडिओ मौखिक, तत्सम परीक्षा पहिल्या टप्यात घेतली जाईल. निरंतर शिक्षण विद्याशाखा आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत शिक्षणक्रमांची प्रात्यक्षिक परीक्षा ८ ते २८ मे या काळात घेतली जाईल.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा मेमध्ये
RELATED ARTICLES
