जिल्ह्यात प्रस्तावित १०० मॉडेल स्कूलच्या इमारतींच्या बांधकामाचा श्रीगणेशा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ‘इम्पथी’ या मुंबईस्थित सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एकूण उभारण्यात आलेल्या ५४ इमारतींपैकी ११ इमारती या ‘मॉडेल स्कूल’साठी वापरण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील सहयोगी सामाजिक संस्थेने केवळ इमारत बांधकामाची जबाबदारी घेतली असून, शाळेतील अध्यापनाचा दर्जा, गुणवत्ता सुधार आदी उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच जबाबदार असणार आहे. नुकतेच निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
निफाडसह बागलाण, चांदवड, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, येवला आदी तालुक्यांमध्ये अकरा ठिकाणी मॉडेल स्कूलसाठी इमारतींची उभारणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना इम्पथी देणार बळ
RELATED ARTICLES
