Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीएसएससी एमटीसी हवालदार भरती परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट, 'येथे' पाहता येणार निकाल

एसएससी एमटीसी हवालदार भरती परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट, ‘येथे’ पाहता येणार निकाल

एसएससी एमटीसी हवालदार भरती परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट, ‘येथे’ पाहता येणार निकाल

SSC MTS हवालदार भरती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. निकाल कसा आणि कुठे पाहायचा जाणून घ्या.

SSC MTS Result 2023 : कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) लवकरच SSC MTS भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (Constable Post) या पदांसाठी 2 ते 19 मे 2023 आणि 13 ते 20 जून 2023 दरम्यान CBT माध्यमात परीक्षा आयोजित केली होती. आता त्या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. रिपोर्टनुसार, एसएससी एमटीएस परीक्षेचा निकाल या आठवड्यात कधीही जाहीर केला जाऊ शकतो. निकाल कोठे पाहाल जाणून घ्या.

SSC MTS हवालदार भरती परीक्षेचा निकाल लवकरच

या आठवड्यात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) लवकरच मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार यांच्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करेल. SSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसएससी एमटीएस निकाल या आठवड्यात कधीही घोषित केला जाऊ शकतो. दरम्यान, कर्मचारी निवड आयोगाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कट ऑफ लिस्टसह Answer Key जाहीर होईल

कर्मचारी निवड आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर, उमेदवारांसाठी कटऑफ देखील जारी केला जाईल. ज्या उमेदवारांना विहित कट ऑफ मिळेल ते भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र असतील. कट ऑफ लिस्टसह, अंतिम Answer Key देखील जारी केली जाऊ शकते. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून Answer Key PDF स्वरूपात डाउनलोड करू शक तील. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की ते अंतिम उत्तर की वर कोणताही आक्षेप घेऊ शकणार नाहीत. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

SSC MTS Result 2023 : निकाल कसा तपासाल?

  • सर्वात आधी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट द्या.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर लिंक सक्रिय होईल, त्यावर क्लिक करा.
  • निकालाशी संबंधित लिंक क्लिक करा.
  • आता उमेदवार PDF उघडेल.
  • उमेदवार पीडीएफमध्ये त्यांचं नाव आणि क्रमांक तपासून निकाल पाहू शकतात.
  • या यादीमध्ये उमेदवाराचे नाव असल्यास, तुम्ही भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठराल.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments