Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीशिष्यवृत्ती अर्जभरणा

शिष्यवृत्ती अर्जभरणा

राज्य परीक्षा परिषद, माध्यमिक शिक्षण संचालनालय, प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी नऊ ते दहा लाख विद्यार्थी देतात. मात्र, गेल्या पाच वर्षांत बहुतांश जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले आहे.राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटली आहे. आवश्यक गुण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देता येत नाही. या पार्श्वभूमीवर निकालात आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments