Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीसेंट्रल बँकेत नोकरीची भन्नाट संधी!

सेंट्रल बँकेत नोकरीची भन्नाट संधी!

सेंट्रल बँकेत नोकरीची भन्नाट संधी!

484 पदांसाठी भरती; लगेच दाखल करा अर्ज

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. यासाठी centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याआधी अधिकृत अधिसूचना नक्की वाचा. सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 20 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट ने पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 20 डिसेंबर 2023

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरती मोहिमेद्वारे एकूण 484 पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही सर्व पदे सफाई कर्मचारी पदावर करण्यात येणार आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करु शकतात.

कशी असेल निवड प्रक्रिया?

या भरतीअंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि भाषा चाचणीद्वारे करण्यात येईल. या भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्थानिक भाषेची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेची तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र, फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. लेखी परीक्षा आणि भाषा चाचणीसोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV Round) आणि वैद्यकिय चाचणी पास करावी लागेल.

अर्ज शुल्क

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शुल्क भरावे लागेल. काही उमेदवारांनी फीमध्ये सवलत असेल. जनरल आणि ओबीसी उमेदवारांना अर्ज भरताना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याशिवाय SC, ST, PWBD आणि महिला उमेदवारांना फीमध्ये सूट देण्यात आली असून त्यांना फक्त 175 रुपये शुल्क भरावं लागेल.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठातून दहावी पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्ष असणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments