Wednesday, January 14, 2026
HomeBank Jobsस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणार भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये होणार भरती

बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारासांठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने रिटार्यड बँक ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवाराचे अर्ज मागवले आहेत. या पदांवर अर्ज करण्याची इच्छा असलेले लोक दिलेल्या स्वरुपामध्ये अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना  या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल इतर कोणत्याही प्रकारे केले गेलेला अर्ज स्वीकार केला जाणार नाही.

महत्त्वाच्या तारिख
एसबीआयने या पदांसाठी १५ जूनपासून अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२३ पर्यंत आहे. उमेदवारांनी या तारखेपूर्वी अर्ज करा.

पद भरतीचा तपशील

या भरती मोहीमेच्या स्वरुपामध्ये एकूण १९४ पदांवर भरती होणार आहे. यापैकी एफएलसी काउन्सलरसाठी १८२ पदे आहेत आणि एफएलसी डायरेक्टरसाठी १२ पदे आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी bank.sbi.careers या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. येथे सर्व तपशीलवार माहिती मिळेल.कोण करू शकते अर्ज
ही भरती रिटार्ड ऑफिसरसाठी आहे त्यामुळे डिग्रीबाबत उल्लेख केलेला नाही. केवळ काउन्सलर पदासाठी उमेदवाराला स्थानिक भाषा बोलता किंवा लिहता येणेआवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्मार्ट मोबाइल फोन आणि कॉम्प्युटर वापरण्याचे ज्ञान असले पाहिजे.

वय मर्यादा

वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, ६० ते ६३ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या नियुक्त्या कराराच्या आधारावर असतील आणि जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी असतील. उमेदवार केवळ ६५ वर्षे वयापर्यंत काम करू शकतात. यानंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

पगार

या पदांवर निवड झाल्यावर उमेदवारांना पदानुसार वेतन मिळेल. साधारणपणे, दरमहा ३५,००० ते ६०,००० रुपये पगार मिळेल. उमेदवाराच्या निवडीबाबत सांगायचे झाल्यास मुलाखतीच्या आधारावर होईल. यासाठी कमीत कमी १०० गुण आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments