योग्य पद्धतीने विश्लेषण करून तयारी केली तर कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना विज्ञान हा विषय हमखास गुण मिळवून देणारा आहे. पण योग्य अॅप्रोच नसेल तर विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठीसुद्धा हा विषय थोडा अवघडच ठरतो.विज्ञान हा विषय सोपा करून अभ्यासायचा असेल तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि राज्य पाठय़ पुस्तक मंडळाची पुस्तके या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. या आधारावर पुढीलप्रमाणे तयारी फायदेशीर ठरेल :प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर लक्षात येते की भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारीत असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणिते सुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्य उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो. बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्यांच्या स्वरूपात पुरेशा ठरतातविज्ञान हा विषय सोपा करून अभ्यासायचा असेल तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि राज्य पाठय़ पुस्तक मंडळाची पुस्तके या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. या आधारावर पुढीलप्रमाणे तयारी फायदेशीर ठरेल प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर लक्षात येते की भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारीत असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणिते सुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्य उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो.बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्यांच्या स्वरूपात पुरेशा ठरतात
सामान्य विज्ञान
RELATED ARTICLES
