भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. मग तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे जर तुम्हाला रेल्वेत नोकरी करायची असेल तर तर तुम्ही ही माहिती संपूर्ण वाचा. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे कर्मचारी विभाग, बिलासपुर डिव्हिजनने बिलासपुर डिव्हीजनमध्ये अप्रेंटीस पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहे. इच्छूक आणि योग्य उमेवदवार या पदांवर दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या अधिककृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात. ३ जून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत ५४८ पदांची भरती होणार आहे.
रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
उमेदवार जो या पदांवर अर्ज करु इच्छितात, त्यांच्याकडे मान्यता प्राप्त संस्थेतून संबधित शाखेत आयटीआयसह १०वी पास उतीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
