रायगड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत ‘रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण रायगड आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर आपले अर्ज सबमिट करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२३ आहे.
पदाचे नाव – रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
एकूण पदसंख्या – १३
शैक्षणिक पात्रता – १२ वी पास, बी.कॉम आणि मेडिकल पदवीधार. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.)
नोकरी ठिकाण – रायगड
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – ३८ वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – ४०२२०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.in/
महत्वाची कागदपत्रे –
- विहीत नमुन्यातील अर्ज.
- शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला.
- NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील व खाजगी संस्थेतील अर्ज करित असलेल्या संबंधित पदाचा अनुभव दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
- आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, पॅनकार्ड इत्यादी.
