Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीराष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) भरती सुरु आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) भरती सुरु आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) भरती सुरु आहे.

राष्ट्रीय परीक्षण एजन्सीने (NTA) राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB – National Horticulture Board) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. या भरती अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन मंडळेतील (National Horticulture Board) विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि उमेदवार exams.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज दाखल करावेत. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.

महत्त्वाच्या तारखा

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख यापूर्वी 5 जानेवारी 2024 होती, ती 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठीच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी दुरुस्ती विंडो उघडण्याची अंतिम मुदत 6 जानेवारी ते 8 जानेवारी 2024 होती, पण आता दुरुस्तीसाठीची अंतिम मुदत बदलून 16 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 करण्यात आली आहे.

 रिक्त पदांचा तपशील

या भरतीअंतर्गत एकूण 44 पदांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यापैकी 19 रिक्त पदे उपसंचालक पदासाठी तर 25 पदे वरिष्ठ उद्यान अधिकारी पदासाठी आहेत. NTA ने जारी केलेल्या माहितीनुसार, NHB भरतीसाठी अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची तारीख  वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, आता उमेदवार 17 जानेवारीपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात.

 शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शैक्षणिक पात्रता काय आहे जाणून घ्या. या भरतीअंतर्गत पदानुसार उमेदवारांनी पदवी / अभियांत्रिकी पदवी / CA/ MCA / MBA / PG पदवी / एमफिल / पीएचडी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

  • उपसंचालक : या पदासाठी उमेदवाराचे वय 5 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 40 वर्ष या दरम्यान असावे.
  • वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी : या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 5 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट असेल. त्यासाठी अधिकृत अधिसूचना तपासा.

 अर्ज शुल्क

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) अंतर्गत उपसंचालक (गट अ) आणि वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब) च्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी अर्ज शुल्कही ऑनलाईन भरावं लागेल. सामान्य उमेदवाराला 1000 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल, तर OBC/EWS किंवा SC/ST उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. PWD म्हणजेच दिव्यांग उमेदवारांना एक रुपयाही भरावा लागणार नाही, त्यांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments