Wednesday, January 14, 2026
HomeRailway Jobsरेल्वे विभागामध्ये होतेय जागांसाठी भरती

रेल्वे विभागामध्ये होतेय जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारे मेगाभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे विभागामध्ये काम करायची इच्छा बाळगणारे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहे. या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत. त्याशिवाय वेबसाइटवर भरतीसंबंधित सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे. २३ मे रोजी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एसीईसीआरमध्ये ‘अप्रेंटिस’  पदाच्या एकूण १०३३ जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ असेल असे भरतीसंबंधित सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे. नोकरी मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी संंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामाचा अनुभव तसेच विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या भरतीसाठीची वयोमर्यादा १८-२४ वयवर्ष इतकी आहे. तसेच मागास वर्गातील उमेदवारांना ५ वर्षांपर्यंतची सूट दिली जाईल. नोकरीच्या ठिकाणाबाबतची माहिती वेबसाइटवरुन मिळवता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments