रेल्वे, बँकेसह विविध ठिकाणी बंपर भरती
अनेक ठिकाणी भरती सुरु आहे. कुठे भरती सुरु आहे, अर्ज नोंदणी कधी सुरु होईल, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख कधी आहे, ही सर्व माहिती थोडक्यात तुम्हाला येथे मिळेल. भरतीसंदर्भातील अधिक माहिती तुम्हांला अधिकृत वेबसाईटवर मिळेल. यानंतर नेमक्या कोणत्या भरतीसाठी अर्ज करायचा हे तुम्ही ठरवू शकता.
RRC NR भरती 2023
रेल्वे रिक्रूटमेंट सेल उत्तर रेल्वेने 3093 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरु होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2024 आहे. या भरतीमध्ये एकूण 3093 शिकाऊ पदांसाठी भरती केली जाईल. अर्ज करण्यासाठी आणि तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्हाला RRC NR च्या rrcnr.org. या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
आयडीबीआय बँकेत भरती
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे, ते idbibank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 89 पदांची भरती केली जाईल.
शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Shipping Corporation of India Ltd) कडून मास्टर मरीनर्स आणि मुख्य अभियंताच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्झ दाखल करा. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार www.shipindia.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करु शकतात.
हायकोर्टाकडून (Bombay High Court) 4500 हून अधिक पदांवर बंपर भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत 4629 रिक्त जांगावर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर आहे. यामध्ये maharastr राज्यातील विविध जिल्हा न्यायालयातील स्टेनोग्राफर ग्रेड-3, ज्यूनियर क्लर्क आणि शिपाई अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करु शकतात
