Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीपूर्व मध्य रेल्वेमध्ये ५६ रिक्त पदांची भरती

पूर्व मध्य रेल्वेमध्ये ५६ रिक्त पदांची भरती

पूर्व मध्य रेल्वेमध्ये ५६ रिक्त पदांची भरती

अनेक तरुण मंडळी नोकरीच्या शोधात असतात. त्या तरुण मंडळीसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वेमध्ये नोकरीची संधी अनेक जण शोधत असतात. आता पूर्व मध्य रेल्वेनी ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. क्रिडा व्यक्ती या पदांच्या तब्बल ५६ जागा रिक्त आहे. या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचे सोने करत लगेच या पदांसाठी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज कसा करावा, शैक्षणिक पात्रता किती, पगार किती असेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.

पदाचे नाव – संबंधित भरती क्रिडा व्यक्ती या पदांकरीता सुरू आहे.
पदसंख्या – क्रिडा व्यक्ती या पदांसाठी एकूण ५६ जागा रिक्त आहे.
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ – २५ वर्षे असावीत.
अर्जपद्धत – अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. त्यामुळे अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेता लवकरात लवकर अर्ज पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाइट – अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.
वेतनश्रेणी – या पदांसाठी वेतन हे १८,००० रुपये आहेत.
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवाराची भारतात कुठेही भरती होऊ शकते.
निवड प्रक्रिया – निवड प्रक्रिया ही सुरुवातीला चाचणी परिक्षा त्यानंतर मिरिटवर आधारित आणि त्यानंतर मुलाखत आणि कागद पडताळणी होईल.

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन वेळेपूर्वी अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवा
अर्ज करण्यापूर्वी https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरील माहिती सविस्तर वाचावी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments