पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी
पुण्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर पुणे महानगरपालिका भरती २०२३ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या – २ शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/
पगार – या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महिना ४५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
असा करा अर्ज –
- भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२३ आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज बाद ठरवले जातील.
