सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना पदांनुसार अर्ज करता येणार आहेत. भरतीबाबतच्या अधिकची माहिती विभागाच्या अधिकृत बेवलाईटवर अपडेट करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे विभागात एकूण तब्बल ३१३ पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याबाबत राज्यशासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांपासून विविध पदांची भरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. याचा कामांवर परिणाम होत असून अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कनिष्ठ अभियंता हा पुणे विभागात गेल्या महिन्यात मान्यता दिलेल्या रस्त्यांची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.पुणे विभागातील २४ हजार १०७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जिओ फेसिंग करण्यात येणार आहे, त्यामुळे या रस्त्यांवर कोणत्याही भागात खड्डा पडल्याची तक्रार आल्यास त्याची संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्या रस्त्यांच्या दर्जावर ऑनलाइन निरीक्षण केले जाणार आहे.
पुणे येथे नोकरीची संधी
RELATED ARTICLES
