पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण प्रेस नोट
*मा.मनिष कलवानिया,पोलीस अधीक्षक, औरंगाबाद* ग्रामीण यांनी जिल्हयातील होणारे रस्ते अपघातांना प्रतिबंध होवुन आळा बसवा या करिता सडक सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमे अंतर्गत महामार्गावरिल दोन लेन मधील तोडलेले दुभाजकांची दुरूस्ती करणे, वाहतुक नियंमाचे दिशा दर्शक बोर्ड लावणे, अपघात प्रवण क्षेत्रात गतीरोधक (स्पीड ब्रेकर) टाकणे, वाहतुक नियमन याबाबत वाहन चालक व मालक यांचे प्रबोधन करून अपघात टाळण्यासाठी पथनाटय, पोस्टर्स, अशा प्रकारे जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे जेणे करून वाहनचालकांना वाहतुक नियमांची शिस्त लागावी जेणे करून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
मा. पोलीस अधीक्षक यांनी दरवर्षी वाढत जाणारे प्राणांतिक अपघाताचे कारणांचे विश्लेषण करुन अपघातातील मयत/जखमी/आरोपी यांचे बाबत सखोल माहिती घेतली असता बहुतांश अपघातामध्ये वाहन चालकांना नेत्र दृष्टीदोष (नजर कमी असणे) हा आजार अपघाताचे एक प्रमुख कारण असल्याचे लक्षात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक यांनी याबाबत पुढाकार घेवुन जिल्हातील प्रवासी तसेच शालेय व जड वाहनाचे वाहन चालक, तसेच गरजु वाहन चालकांसाठी उपविभाग निहाय नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले असुन यामाध्यमांतुन वाहन चालकांची डोळयांची नि:शुल्क तपासणी करण्यात येवुन त्यांना मोफत चष्मांचे वाटप केले जाणार आहे. तसेच ज्या चालकांना मोतीबिंदूचे निदान झाले तर त्यांचे मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया सुध्दा मोफत करण्यात येईल.
दिनांक 12/9/2023 रोजी या उपक्रमांची सुरूवात मा.पोलीस अधीक्षक यांचे प्रमुख उपस्थितीती सिल्लोड शहरातील छत्रपती शाहु महाराज सामाजिक सभागृहात सिल्लोड उपविभागातील पोलीस ठाणे सिल्लोड शहर, सिल्लोड ग्रामीण, अजिंठा, फर्दापुर, सोयगाव येथील वाहन चालकांसाठी नि:शुल्क नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांचे माध्यमांतुन 110 वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत चष्माचे वाटप करण्यात येणार आहे. हा स्तुत्य उपक्रम याच प्रमाणे इतर उपविभागात सुध्दा राबविण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, या उपक्रमांचे प्रमुख केंद्र बिंदु हा वाहन चालक असुन बरेच रोड अपघात हे वाहन चालकांना असणा-या दृष्टीदोषाचे कारणामुळे घडत आहे असे दिसुन येते. त्यामुळे या शिबीरांचे माध्यमांतुन प्रवासी व गरजु सर्व वाहनचालकांचे नेत्रतपासणी मोफत करण्यात येणार असुन वाहनचालकांनी त्याचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे महामार्गावरिल व्यवसायीक हे त्यांचे आस्थापनाकडे येणासाठी लेन मधील दुभाजक अवैधपणे फोडतात यावर सुध्दा प्रतिबंध घालुन त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकांनी वाहतुक नियंमाचे काटेकोरपणे पालन केल्यास होणारे प्राणांतिक अपघातामध्ये घट होवु शकते.
नमुद कार्यक्रम प्रसंगी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, डॉ. दिनेश कुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, सिताराम मेहत्रे, स.पो.नि. प्रमोद भिंगारे, भरत मोरे, अनमोल केदारे, डॉ. रोहीत बन, नेत्र तज्ञ, डॉ. शेख उसामा, डॉ. मो. इब्राहिम यांचे सोबत मोठया प्रमाणावर नागरिक व वाहन चालक यांची उपस्थितीती होती.
