पदवीधरांना नोकरीची संधी! MPSC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मराठी भाषा विभाग, महसूल आणि वन विभागामध्ये प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क आणि अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब या पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ साठी वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ – पदाचे नाव – प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब.
एकूण पदसंख्या – ३२
शैक्षणिक पात्रता – प्राचार्य/संचालक : Ph.D
- अनुवादक मराठी गट-क : मराठी भाषेतील पदवी
- अनुवादक हिंदी गट-क : हिंदी भाषेतील पदवी
- सहायक वन सांख्यिकी गट-ब : पदव्युत्तर पदवी
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्जाती पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ३० ऑक्टोबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
