मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी!
CIDCO अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु
शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अर्थात सिडको (CIDCO) इथे काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत लिपिक (Clerk) पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड भरती २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड भरती २०२४
पदाचे नाव – लिपिक.
शैक्षणिक पात्रता – अकाउंटन्सी/ फायनान्शिअल मॅनेजमेंट/ कॉस्ट अकाउंटिंग/ मॅनेजमेंट अकाउंटिंग/ ऑडिटिंग सह B.Com/ BBA/ BMS.
वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी – खुला प्रवर्ग – ११८० रुपये.
- मागासवर्गीय – १०६२ रुपये.
नोकरीचे ठिकाण –mumbai
महत्वाच्या तारखा – ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ९ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाईट – https://cidco.maharashtra.gov.in/
