Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीमुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज!

मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज!

मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज!

मुंबई आयआयटीतील (IIT-B) प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई आयआयटीत (IIT-B) सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरांच्या प्रस्तावात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. यंदा 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.  पहिल्या टप्प्यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगस्थित एकूण 63 आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संधी (job offers) या पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या.

1 कोटीहून अधिक वार्षिक पॅकेज

मुंबई आयआयटीतील एकूण 85 विद्यार्थ्यांना यंदाच्या प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटीहून अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे. मागील वर्षीच्या प्लेसमेंटच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सरासरी विद्यार्थ्यांच्या पॅकेजमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे चित्र आहे. mumbai आयआयटीमध्ये नोकरीसाठीच्या कॅम्पस मुलाखतीसाठी एकूण 388 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यानी सहभाग घेतला. मागील शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटमध्ये 16 विद्यार्थ्यांनी 1 कोटी पेक्षा अधिक वार्षिक पॅकेजचा स्वीकारले होते, यंदा पहिल्या टप्प्यात 85 विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिकचं पॅकेज मिळालं आहे.

सरासरी पॅकेजमध्ये वाढ, 1188 विद्यार्थ्यांना नोकरी

यंदा सरासरी पॅकेजमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 21.82 लाख रुपये सरासरी वार्षिक पॅकेज होते तर यंदा 24.02  लाख रुपये सरासरी वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.नोकरीच्या प्रस्तावांमध्येही यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ दिसते आहे. यंदा 20 डिसेंबरपर्यंत एकूण 1340 नोकरीचे प्रस्ताव विविध कंपन्यांनी दिले, त्यापैकी 1188 विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यात यश आले. यामध्ये पीएसयूमध्ये   7 जणांचा  तसेच इंटर्नशिपद्वारे 297 पीपीओचा समावेश असून यापैकी नोकरीचे 258  प्रस्ताव स्वीकारण्यात आले आहेत.

कोणत्या क्षेत्रात मिळाली नोकरीची संधी ?

या हंगामात एक्सेंचर,एअरबस, एअर इंडिया,अॅपल, आर्थर डी. लिटल,बजाज, बार्कलेज,कोहेसिटी, दा विंची, डीएचएल फुलेरटन,फ्युचर फर्स्ट, जीई- आयटीसी, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरन ,गुगल, होंडा आर अँड डी , आयसीआयसीआय -लोम्बार्ड,आयडीया फोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल,जग्वार लँड रोव्हर,जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू ,कोटक सिक्युरिटीज,मार्श मॅक्लेनन, महिंद्रा ग्रुप, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टॅनले, मर्सिडीज-बेंझ, एल अँड टी, एनके सिक्युरिटीज या अव्वल कंपन्या सहभागी झाल्या होत्या. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान  / सॉफ्टवेअर, वित्त / बँकिंग / फिनटेक, व्यवस्थापन सल्लामसलत, डेटा विज्ञान  आणि अॅनालिटिक्स, संशोधन ही नोकरीचे सर्वाधिक प्रस्ताव देणारी क्षेत्रे आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments