Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऋतुजा भोसले, स्वप्नील कुसाळे यांचे अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस, नेमबाजीत पटकावले सुवर्णपदक

मुंबई /  चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसले हिने व पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळे याने सुवर्णपदक पटकावले आहे. या दोघांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी सुरुवातीपासूनच या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऋतुजाने टेनिस मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वप्नीलने देखील नेमबाजीचा उत्कृष्ट कामगिरीचा आलेख उंचावणारी कामगिरी केली आहे. या दोघांनीही सांघिक खेळात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारताला पदकांची कमाई करून दिली आहे, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशासाठी ॠतुजा व स्वप्नीलचे तसेच त्यांच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे व दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments