नोकरी करतानाच UPSC ची तयारी कशी करावी?
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा सर्वात कठीण मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असतात. या कारणास्तव याला सर्वात मोठी स्पर्धात्मक परीक्षा देखील म्हटले जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक यात सहभागी होतात, पण फार कमी लोक यशस्वी होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी पूर्व परीक्षा, मग मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत. ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे क्लासेला जातात, काही वर्ष खर्ची घालतात. पण जे नोकरी करतात त्यांच्यासाठी परीक्षेची तयारी करणे अधिक कठीण असते. त्यामुळे नोकरीवर असणारे अनेकजण इच्छा असूनही या परीक्षेसाठी अर्जच करत नाहीत. पूर्णवेळ नोकरीबरोबरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणे हे मोठे आव्हान आहे. या समस्येवर भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) हिमांशू त्यागी यांनी काही टिप्स दिल्या आहेत. पूर्ण वेळ नोकरी करत असताना UPSC परीक्षेची तयारी कशी करू शकतात याबद्दल त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट X वर याबद्दल पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले –
1 सकाळी 3.30 वाजता उठून चार तास अभ्यास करा.
2 काम संपल्यानंतर अर्धा तास वाचन करा.
4 तुमच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये अभ्यासाचे साहित्य ठेवा. जेणेकरून तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करता येईल.
5 वीकेंडला दहा तास अभ्यास करा.
