Wednesday, January 14, 2026
Homeनिकालमहाराष्ट्र एमएचटी-सीईटी चा निकाल जाहीर

महाराष्ट्र एमएचटी-सीईटी चा निकाल जाहीर

महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज १२ जूनला जाहीर करण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित  आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र  ग्रुप्ससाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रेन्स टेस्ट २०२३ चा निकाल घोषीत करण्यात आला आहे. परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट आणि  वर तपासू शकता. या एमएचटी-सीईटीच्या परीक्षेसाठी एकूण ६,३६,०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३,०३,०४८ विद्यार्थ्यांनी पीसीएम  विभागासाठी तर २,७७,४०३ विद्यार्थ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान ही परीक्षा दिली. १५ मे ते २० मे पर्यंत पीसीबी ग्रुपच्या सीईटीसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ३,३३,०४१ विद्यार्थ्यांनी नोंदकी केली होती. परंतु, यापैकी ३,१३,७३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या निकालाची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असून उमेदवारांनी त्यांच्या परीक्षेचा रोलनंबरच्या मदतीने निकाल तपासू शकता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments