Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीमराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वडाळा येथील...

मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे घेतले श्रीकृष्णाचे दर्शन

मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे घेतले श्रीकृष्णाचे दर्शन

मुंबई / मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला वेग देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वडाळा येथील महानुभाव श्री कृष्ण ज्ञान मंदिर येथे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले व पूजाही केली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कविश्वर कुलभूषण आचार्यप्रवर श्रीविजयराज बाबा शास्त्री, राणीबाईजी शास्त्री, श्री राहुलदादाजी महानुभाव, धर्मकुमार प्रसाद महानुभाव तसेच आनंद मेमोरियल चक्रधर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथाचे कार्य मोठे असून हे कार्य आज सर्वत्र पोहोचले आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर श्री कृष्ण चरित्रात आपल्याला मिळते. त्यातून ऊर्जा मिळते तसेच जगण्याची दिशाही मिळते. महानुभाव पंथाच्या विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सोयी सुविधा उभारण्याच्या कामांनाही वेग देण्यात येत आहे. या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करुन भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments