आयटी टेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे एचसीएल टेक या कंपनीने फ्रेशर्सना संधी देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी पुढील आर्थिक वर्षात २०२४ मध्ये तब्बल १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनीने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली असून कंपनी कॅम्पस भरतीला प्रोत्साहन देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. याबाबतचे वृत्त महाभरतीने दिलं आहे. एकीकडे जगभरातील मोठमोठ्या कंपन्या नोकरकपात करत असताना आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक कंपनीने यंदा २०२३ मध्ये अनेक फ्रेशर्सना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशातच आता कंपनी पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४ मध्येही लॅटरल हायरिंगवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी १५ हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.
कंपनी देणार तब्बल १५ हजार संधी
RELATED ARTICLES
