Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डात नोकर भरती,

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डात नोकर भरती,

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डात नोकर भरती,

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डात नोकर भरती, लाखोंचं वेतन मिळवण्याची सुवर्णसंधी, कोण करु शकतं अर्ज?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) कडून विविध पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. याद्वारे 74 पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत असाल, तर ही संधी अजिबात सोडू नका.

इच्छुक उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात : cpcb.nic.in

CPCB Recruitment 2023: कोणत्या पदांसाठी केली जाणार भरती?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भरती जारी करण्यात आली असून या प्रक्रियेतंर्गत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत, देशातील विविध राज्यांमध्ये NCAP सल्लागार A, B आणि C च्या 74 पदांवर भरती केली जाणार आहे.

CPCB Recruitment 2023: भरती प्रक्रियेसाठी कोण करू शकतं अर्ज? 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या भरतीसाठी 65 वर्षांपर्यंतचे उमेदवार 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) कडून जारी करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला प्रतिमहा 60 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उच्च पदांसाठी प्रतिमहा 1 लाख 20 हजार रुपयांचं वेतन दिलं जाईल.

CPCB Recruitment 2023: नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट काय? 

जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पीजी किंवा ग्रॅज्युएशन पदवी असावी. यासोबतच संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा. सल्लागार B साठी, किमान 5 वर्षांचा अनुभव असावा, तर सल्लागार C साठी, किमान 10 वर्षांचा अनुभव असावा.

CPCB Recruitment 2023: कशी असेल निवड प्रक्रिया? 

या पदासाठी सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर निवड करुन निवड झाल्याचं पत्र पाठवलं जाईल.

CPCB Recruitment 2023: नोकरीसाठी वयोमर्यादा काय? 

जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय किमान 21 वर्ष आणि कमाल 65 वर्ष असावं.

CPCB Recruitment 2023: कसा कराल अर्ज? 

अधिकृत वेबसाईट cpcb.nic.in वर लॉगइन करा.
त्यानंतर अप्लाई लिंकवर क्लिक करा.
स्क्रिनवर तुम्हाला एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये तुमची माहिती भरावी लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील.
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पुढे फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
त्यानंतर इच्छुक उमेदवारांना पेमेंट भरावं लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments