Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीकामगाराचा मुलगा झाला आयपीएस

कामगाराचा मुलगा झाला आयपीएस

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल काल (मंगळवार, २३ मे) जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात महाराष्ट्रातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. मुंबईतील हज हाऊस येथे हज कमिटी ऑफ इंडियाद्वारे चालवल्या जाणार्‍या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांनी यंदाच्या यूपीएससी परिक्षेत बाजी मारली आहे. आयेशा काझी, सय्यद एम. हुसेन, तस्कीन खान आणि एम. बुरहान जमान अशी या चार यशस्वी विद्यार्थ्यांची नावं आहेत.या चौघांनाही २०२१ च्या अखेरीस संस्था सोडावी लागली होती, कारण हज कमिटीने संस्थेतील प्रवेश क्षमता कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे चौघे जाफर सुलेमान आयएएस संस्थेत दाखल झाले. सय्यद एम. हुसेन हा या परिक्षेची तयारी करण्यासाठी आधी पुण्याला आणि नंतर दिल्लीला गेला. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे तो हज हाऊसला आला. त्यानंतर तो सुलेमान आयएएस संस्थेत गेला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments