ITBP मध्ये बंपर भरती
शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे.आयटीबीपी (ITBP) नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात भरती सुरु आहे. ITBP मध्ये जीडी कॉन्सेबल आणि असिस्टेंट कमांडंट या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत 248 पदांवर भरती केली जाणार आहे. आयटीबीपीकडून (ITBP) या भरतीसाठी वेगवेगळे अर्ज करावे लागतील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023
कॉन्स्टेबल जीडी (क्रीडा रिक्त जागा)
- अॅथलेटिक्स – 42 पदे
- एक्वाटिक्स – 39 पदे
- घोडेस्वार – 8 पदे
- नेमबाजी – 35 पदे
- बॉक्सिंग – 21 पदे
- फुटबॉल – 19 पदे
- जिम्नॅस्टिक – 12 पदे
- हॉकी – 7 पदे
- वेटलिफ्टिंग – 21 पदे
- वुशु – 2 पदे
- कबड्डी – 5 पदे
- कुस्ती – 6 पदे
- तिरंदाजी – 11पदे
- कयाकिंग – 4 पदे
रिक्त जागा तपशील
सहाय्यक कमांडंटच्या भरतीसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 2 पदे आणि SC श्रेणीतील उमेदवारांसाठी 2 पदे निश्चित करण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर मागासवर्गीयांसाठी 2 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
अर्ज फी
सामान्य आणि OBC तसेच EWS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. अनुसूचित जाती, जमाती, महिला प्रवर्गासाठी सूट असल्याने त्यांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज करणारे उमेदवार जर सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील असतील तर त्यांना अर्ज फी म्हणून 400 रुपये द्यावे लागतील. SC, ST आणि महिला वर्गाला कोणतेही अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.
कॉन्स्टेबल पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार मिळेल. असिस्टंट कमांडंट पदासाठी, उमेदवारांना लेव्हल-10 नुसार 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये पगार दिला जाईल.
अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी आधी recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना वाचा.
- अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करा.
- अर्जाची फी भरा.
- त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.
