इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू
बँकमध्ये नोकरी करण्याची इच्छा अनेकांची असते. आता अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण इंडियन बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी (SO)” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण १४६ रिक्त उपलब्ध असून या सुवर्ण संधीचे सोने तुम्ही करू शकता. इंडियन बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी (SO)” या पदांसाठी अर्ज कसा भरायचा? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
पदाचे नाव- इंडियन बँक अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी (SO) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
पदसंख्या – विशेषज्ञ अधिकारी (SO) या पदांच्या एकूण १४६ रिक्त जागा आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार Graduate Degree / B.E / B.Tech / CA / MBA/ ICWA / CFA / PG पदवी असणे आवश्य आहे.
वयोमर्यादा – विशेषज्ञ अधिकारी (SO) या पदांसाठी पात्र उमेदवाराचे वय २२ ते ४० वर्षे असावे.
अर्ज पद्धती – “विशेषज्ञ अधिकारी (SO)” पदांसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२४ आहे त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा.
अधिकृत वेबसाईट – या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.indianbank.in/ या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करावे.
वेतन – वेगवेगळ्या पदांनुसार ३६,००० ते ८९, ८९० पर्यंत पगार मिळेल.
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क जाणून घ्या.
- जनरल – १०००/- रुपये
- SC/ST/PWBD – १७५/- रुपये
अर्ज कसा करावा?
- https://ibpsonline.ibps.in/ibsofebr24/ या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली अधिसुचना नीट वाचावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे नीट जोडून अर्ज भरावा.
- सर्वात शेवटी अर्ज शुल्क भरावा.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच १ एप्रिलपूर्वी करावा अन्यथा अर्ज अपात्र ठरवला जाईल.
