Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीहिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

नवी दिल्ली / देशाचे 12वे  मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. श्री.समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.

हिरालाल समरिया यांच्याविषयी

श्री. समरिया यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी या दुर्गम आणि लहान गावात 14 सप्टेंबर 1960 रोजी झाला. ते 1985 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव आणि अतिरिक्त सचिव पदावर काम केले आहे. रसायने आणि खते मंत्रालयातील सहसचिव, तसेच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातही त्यांनी आपली सेवा दिलेली आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments