जनरल इन्शुरन्स कॉरपोरेशनमध्ये नोकरभरती सुरु
इन्शुरन्स कॉर्पोरेशनने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. या भरतीअंतर्गत जीआयसी (GIC Recruitment 2024) संस्थेत अधिकारी स्केल-1 पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवार gicre.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
या भरती मोहिमेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. त्याआधी उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल करावा. उमेदवारांना फॉर्मची हार्ड कॉपी देखील सबमिट करावी लागणार असून यासाठीची अंतिम तारीख 27 जानेवारी 2024 आहे.
किती पदांवर भरती?
या भरती मोहिमेत एकूण 85 पदांवर भरती केली जाणार आहेत या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवाराने संबंधित क्षेत्रात BE / B.Tech / ग्रॅज्युएशन / पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे आणि वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1000 रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. दरम्यान, SC, ST, PH आणि अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करायचा?
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी www.gicre.in या अधिकृत वेबसाइटवर जावं.
- यानंतर उमेदवाराच्या होमपेजवर असिस्टंट मॅनेजर (स्केल I ऑफिसर्स) च्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर उमेदवारासमोर एक नवीन पेज उघडेल.
- आता उमेदवारांनी या स्क्रिनवरील नवीन नोंदणीवर क्लिक करून नोंदणी करावी.
- त्यानंतर उमेदवाराला इतर माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर उमेदवाराने स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करावा.
- त्यानंतर उमेदवार अर्जाची फी भरावी लागेल.
- त्यानंतर उमेदवारांनी फॉर्म जमा करावा.
- आता उमेदवार फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन हार्ड कॉपी जमा करावी लागेल.
