Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीइंग्रजी विषयात चांगले गुण

इंग्रजी विषयात चांगले गुण

पुढील आठवड्यापासून आयबीपीएस क्लर्क २०२१ पूर्व परीक्षा  सुरू होत आहे. आता परीक्षेला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणत्या विभागातील कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आणि नेमका कुठला अभ्यास करायचा याबाबत विद्यार्थ्यांची तयारी सुरु आहे. या परीक्षेतील इंग्रजीच्या पेपरमध्ये चांगले गुण कसे मिळवायचे याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाल देणार आहोत.इंग्रजी भाषेचा पेपर हा आयबीपीएस लिपिक २०२१ प्रिलिम्स  परीक्षेतील स्कोअरिंग विषयांपैकी एक आहे. इंग्रजी विषयामध्ये मूलभूत व्याकरण आणि भाषा कौशल्यातून जास्त गुण मिळवू शकता. त्यामुळे आता परीक्षा तोंडावर असताना इंग्रजी भाषेत चांगले गुण कसे मिळवायचे ते जाणून घेऊया. इंग्रजी भाषा हा आयबीपीएस क्लर्क २०२१ पूर्व परीक्षेचा एक महत्त्वाचा विभाग आहे, ज्यासाठी ३० गुण आहेत. यातील प्रश्न सामान्यतः अवघड असले तरी उमेदवारांना भाषेवर चांगली पकड आणि वाचनाची सवय असेल तर आयबीपीएल क्लर्क परीक्षेच्या इंग्रजी विषयात ते चांगले गुण मिळवू शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments