तुम्हाला जर व्हिडिओग्राफीची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे प्रसार भारती दूरदर्शन न्यूजने पूर्णवेळ कराराच्या आधारावर व्हिडिओग्राफर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार व्हिडिओग्राफर पदाच्या ४१ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठीचे आवश्यक पात्रता निकष, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराच्या कामाचा कालावधी २ वर्षांपर्यंत असेल. निवडलेल्या उमेदवाराचे पोस्टींग नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.
दूरदर्शनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
RELATED ARTICLES
