CBSE बोर्डाकडून 10वी आणि 12वीची डेटशीट जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या या परीक्षा 10 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10वी आणि 12वीची डेटशीट नुकतीच जारी केली आहे. त्याबरोबरच काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन डेट शीट डाऊनलोड करू शकतात.
‘या’ संकेतस्थळांना भेट द्या
- cbse.gov.in
- cbse.nic.in
‘असे’ करा डाऊनलोड
- सर्वात आधी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जावे.
- cbse.nic.in. या वेबसाईटवर गेल्यानंर सर्व अपडेट तपासावे.
- यानंतर, विद्यार्थी मुख्यपृष्ठावरील CBSE टॅबवर खाली स्क्रोल करा.
- इयत्ता 10वी/12वीची डेटशीट विद्यार्थ्यांसमोर ओपन होईल.
- विद्यार्थी ही डेटशीट डाऊनलोड करू शकतात.
- डाऊनलोड केल्यनंतर तुम्ही डेटशीटची प्रिंट आऊट देखील काढू शकता.
