Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीसीबीएसई बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

सीबीएसई बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

सीबीएसई बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

इयत्ता दहावी (10th CBSE Board Exam 2024) आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक (12th CBSE Board Exam 2024) जाहीर केलेलं. आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. जे विद्यार्थी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आपलं वेळापत्रक पाहू शकतात. तसेच, विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोडही करू शकतात.

सीबीएसईनं जारी केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार, काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीची तिबेटमधील पेपर परीक्षा आता 23 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर 4 मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच, इयत्ता दहावीची रिटेल परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार होती, ती आता 28 फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता 11 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा 13 मार्चला संपणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा मात्र 2 एप्रिलला संपणार आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत सर्व दिवस परीक्षा होणार आहे.

‘या’ संकेतस्थळांना भेट द्या 

cbse.gov.in
cbse.nic.in

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments