भारतीय नौदलात १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!
भारतीय नौदल अकादमी अंतर्गत फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या १२९ उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची आणि अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेली पहिली तारीख सोडून ६० दिवसांनंतर मोजली जाणार आहे. भारतीय नौदल भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.
भारतीय नौदल भरती २०२३
पदाचे नाव – फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन.
एकूण पदसंख्या – १२९
शैक्षणिक पात्रता – १० वी पास. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी भरितीची जाहिरात अवश्य पाहा.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D -ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश – ५३००१४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६० दिवसाच्यात आत
अधिकृत वेबसाईट – http://www.joinindiannavy.gov.in
