भारतीय नौदल 910 पदांवर भरती
भारतीय नौदलाने (Indian Navy) 8 डिसेंबर 2023 रोजी 910 विविध रिक्त पदांसाठी INCET अधिसूचना 2023 जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करु शकतात.
भारतीय नौदल भरती
एकूण रिक्त जागा : 910
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) चार्जमन – 42
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञान पदवी.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून मॅट्रिक पास किंवा त्याच्या समकक्ष
3) ट्रेडसमन मेट – 610
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून 10वी उत्तीर्ण, संबंधित व्यापारातील मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कडून प्रमाणपत्र”.
वयोमर्यादा
- चार्जमन – 18-25 वर्षे
- सिनियर ड्रॉफ्ट्समन – 18-27 वर्षे
- ट्रेड्समन मेट – 18-25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन
भारतीय नौदल भरतीच्या 910 रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. 18 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची लिंक सक्रिय होईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : joinindiannavy.gov.in
