Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीभारतीय हवाई दलात नोकरीची संधी!

भारतीय हवाई दलात नोकरीची संधी!

भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! 

भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज, 17 जानेवारीपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार भारतीय हवाई दलात अग्निपथ  योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय हवाई दलाने अग्निवीर भरतीची  अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, या मोहिमेसाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तर या पदांसाठी उमेदवारांची निवड वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या आधारे केली जाईल.

भारतीय हवाई दलात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात

या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया (Agniveer Recruitment 2024) आजपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी (Candidate) वेळीच अर्ज दाखल करा. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत साइट agnipathvayu.cdac.in/AV वर जाऊन ऑनलाईन अर्ज (Online Application) करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि वेळीच अर्ज दाखल करा.

 महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 17 जानेवारी 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024

 उमेदवारांची निवड कशी होईल?

भारतीय हवाई दलात (Indian Air Force) अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेअंतर्गत उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी यासह इतर निकषांवर करण्यात येणार आहे. 17 मार्च 2024 रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेशी संबंधित अभ्यासक्रम, मॉडेल प्रश्नपत्रिका, तात्पुरती यादी इत्यादींसाठी उमेदवार अधिकृत पोर्टल agnipathvayu.cdac.in/AV ची मदत घेऊ शकतात.

 वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा.

या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. प्रचारासाठी, उमेदवारांना जीएसटीसह 550 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments