बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी
बँक ऑफ बडोदाने नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ची भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच अर्ज दाखल करा. या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ व्यवस्थापकाची एकूण 250 पदे भरली जाणार आहेत.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 6 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी. यासोबत रिलेशनशिप किंवा क्रेडिट मॅनेजमेंटचा आठ वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
वयाबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे किमान वय 1 डिसेंबर 2023 रोजी 28 वर्षे आणि कमाल वय 37 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
अर्ज फी
सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह 100 रुपये भरावे लागतील. अर्जाची फी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.
निवड प्रक्रिया
BOB पात्र उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे भरती करेल. ऑनलाइन चाचणी इत्यादींची माहिती बँकेकडून वेळेत दिली जाईल.
