Wednesday, January 14, 2026
HomeAll India Government Jobsमाजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

छत्रपती संभाजीनगर, दि.29:- 136 च्या इन्फंट्री टेरिटोरियल आर्मी पर्यावरण, महार बटालियन मध्ये  21 ते 23 एप्रिल  2025 या कालावधीत एसआरपीएफ कॅम्प ग्राऊंड धुळे शहर, धुळे येथे माजी सैनिक व वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्याम्साठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी शारीरिक निकष आणि वैद्यकीय तपासणीसाठी सर्व कागदपत्रांसह दि.21 एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वा. भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे,असे आवाहन लेफ्ट. प्रभु  अमित सी. यांनी केले आहे.

या भरतीप्रक्रियेत शिपाई जनरल ड्युटी पद -44 फक्त महाराष्ट्रातील माजी सैनिक आणि केंद्र सरकार पर्यावरण मंत्रालय, आणि वन विभाग, महाराष्ट्र सरकार निवृत्त महिला कर्मचारी यांच्या साठी; कारकून पद – 6, आचारी पद – 1, नाभीक पद – 1, मसालची पद – 1, वेटर पद – 1, लोहार पद – 1,

पात्रता : माजी सैनिक आणि सेवानिवृत्त महिला(वन व पर्यावरण विभाग) वयोमर्यादा 50 वर्षापेक्षा जास्त नसावी. माजी सैनिक (केवळ पेन्श्नधारक) साठी किमान वयोमर्यादा नाही परंतु सेवानिवृत्ती नंतर 5 झाली नसावीत. पर्यावरण मंत्रालय, केंद्र सरकार आणि वन विभाग, महाराष्ट्र सरकाराच्या माजी महिला कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान वयोमर्यादा नाही, परंतु सेवानिवृत्ती नंतर 5 वर्षापेक्षा जास्त नसावीत.

वर्ग:- डिस्चार्ज पुस्तकानंतर (अनुकरणीय / खूप चांगले) (Exemplary / Very Good)

पात्रता:– माजी सैनिक (केवळ पेन्शनधारक) आणि माजी माजी महिला कर्मचारी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभाग (स्वेच्छेने सेवानिवृत्त) केंद्र सरकार आणि राज्य सरकार (वन विभाग) मध्ये 20 वर्षांच्या सेवेसह

शारिरीक चाचणी :- (केवळ पुरुषांसाठी):- 1 मैल धावणे शर्यंत 7 मिनिटे 9 सेंकदात पूर्ण करता आली पाहिजे. 9 फूट खड्डा – 9 फूट खड्डा उडी मारुन पार करता आला पाहिजे. बिम – नियमानूसारसंतुलन बिम चालत जावे लागेल.

महिलांच्या भरती प्रक्रियेत मुलाखत भर्ती अधिकारी मंडळाद्वारे घेतली जाईल.रोपवाटिकेत वृक्षारोपण आणि रोपे तयार करण्याची कार्यक्षमता,वैद्यकीय तपासणी

आवश्यक कागदपत्रे :-पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO),डिस्चार्ज बुक /  ESM ओळखपत्र,पासपोर्ट आकाराचा फोटो 08, शिक्षण प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र / आधार कार्ड

 निवडलेल्या उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बोर्ड अधिकाऱ्यांकडून मुलाखत घेतली जाईल.

अट :- भरती प्रक्रिया पूर्णपणी गुणवत्तेवर आणि रिक्त : पदावर आधारीत असेल. प्रादेशिक आर्मी पर्यावरण महार बटालियनमध्ये कोणत्याही प्रकाराच्या पेन्शनाचा प्रस्ताव नाही.भारतीय लष्कर आणि प्रादेशिक सैन्यातील माजी सैनिक आणि पर्यावरण, विभाग केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्वीचे पेन्शन मिळत राहील.सुरुवातीला फक्त दोन वर्षासाठी भरती केली जाईल, नंतर जवानाच्या कामाच्या आणि  शिस्तीच्या मूल्यमापनाच्या आधारावर, त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी प्रादेशिक सैन्याच्या नियमांनुसार नोकरी एक वर्षासाठी वाढविली जाईल.रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अपघात, घटनेची जबाबदारी भरती मंडळ घेणार नाही.या मोफत भरती सेवा आहेत. यामध्ये भरतीसाठी कोणालाही लाच देऊ नका.मध्यस्थांपासून दूर राहा. जर उमेदवार लाच देताना पकडला गेला तर त्याची निवड रद्द केली जाईल.कोणत्याही छेडछाड केलेल्या किंवा ओव्हरराईट केलेल्या कागदपत्रांचा भरतीसाठी विचार केला जाणार नाही.चुकीची कागदपत्रे आणि चुकीची माहिती दिल्यास कायद्यानुसार शिक्षा किंवा नोकरीतून बडतर्फ केले जाईल. रॅलीच्या ठिकाणी मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. कोणत्याही अधिक माहितीसाठी किंवा चौकशीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधवा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments