दहावीची परीक्षा दिलेल्या आणि निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील विविध ज्युनियर कॉलेजांमधील अकरावीच्या र्गातील प्रवेशप्रक्रियेला आज, सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेद्वारे अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाइन नावनोंदणी करावी लागेल. २३ ते २७ मे केवळ सराव अर्ज भरून घेतले जातील. ३० मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी, अर्ज भरण्याचा सराव आणि मॉक डेमो नोंदणीकरिता २३ ते २७ मेदरम्यान मुदत देण्यात आली आहे. ज्युनियर कॉलेजे आणि उच्च माध्यमिक शाळांची नोंदणी तसेच माहितीची दुरुस्ती प्रक्रिया ३० मेपासून सुरू होईल आणि राज्य मंडळाच्या परीक्षांच्या निकालापर्यंत ही नोंदणी करता येईल. ऑनलाइन नोंदणी व अर्जाचा पहिला भाग भरण्यास ३० मे रोजी तर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास दहावीच्या निकालानंतर प्रारंभ होईल.
अकरावी प्रवेशांचे सराव अर्ज आजपासून
RELATED ARTICLES
