Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीआयकर विभागात बंपर भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात

आयकर विभागात बंपर भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात

आयकर विभागात बंपर भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात

या भरतीअंतर्गत आयकर विभागात विविध पदांवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार incometaxrajasthan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

आयकर विभागात 291 पदांवर भरती

आयकर विभागाने लघुलेखक, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), सहाय्यक पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केलीआहे. उमेदवारांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्य स्टेनोग्राफर, एमटीएस, असिस्टंट या रिक्त जागांवर नोकरीची उत्तम संधी आहे. आयकर विभागातील भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 16 जानेवारी आहे. भारतातील सर्व पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. आयकर विभागाने 22 डिसेंबरला या भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे.

महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख : 22 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

रिक्त पदांचा तपशील

आयकर निरीक्षक (ITI) : 14 पदे

स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो) : 18 पदे

कर सहाय्यक (TA) : 119 पदे

मल्टी-टास्किंग स्टाफ (MIS) : 137 पदे

कॅन्टीन अटेंडंट (CA) : 03  पदे

वयोमर्यादा

किमान वय : 18 वर्षे

कमाल वय : 30 वर्षे

किती पगार मिळेल?

इन्कम टॅक्सचे वेतन निरीक्षक (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनो), कर सहाय्यक (TA) या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पद आणिवेतन श्रेणीनुसार पगार मिळेल.

  • आयकर निरीक्षक : 44,900-142,400 रुपये
  • कर सहायक : 25,500-81,100 रुपये
  • आशुलिपिक ग्रेड II : 25,500-81,100 रुपये
  • मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) : 18,000-56,900 रुपये

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल (GEN), ओबीसी (OBC), SC/ST या उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी ऑनलाइन पेमेंट पद्धतीने भरावी लागेल.

शैक्षणिक पात्रता

आयकर निरीक्षक (ITI) पदासाठी उमेदवाराचे पदवी शिक्षण पूर्ण झालेलं असावं. स्टेनोग्राफर पदासाठी पात्र उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे. कर सहाय्यक (TA) पदासाठी उमेदवाराने पदवी शिक्षण पूर्ण केलेलं असावं. मल्टी-टास्किंग स्टाफ (MIS) आणि कॅन्टीन अटेंडंट (CA) या पदांसाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments