आदिवासी कल्याणासाठी २४ हजार कोटी ; पंतप्रधान मोदींची घोषणा
बैतूल / केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मोदी यांनी मंगळवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत देशात आदिवासींसाठी २४ हजार कोटींची योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, येथे उपस्थित असलेली प्रचंड गर्दी हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार याचे संकेत आहेत. मध्यप्रदेशातील जनतेत प्रचंड उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस संतांकडे वळली आहे. कांग्रेसला माहिती आहे की मोदींच्या हमीपुढे त्यांचे खोटे आश्वासन टिकणार नाही.
