Thursday, January 15, 2026
Homeचालू घडामोडीआधी पोलीस भरती, मग आता 'महाजेनको'मधील भरती परीक्षेचा पेपर फुटला ! स्पर्धा...

आधी पोलीस भरती, मग आता ‘महाजेनको’मधील भरती परीक्षेचा पेपर फुटला ! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

आधी पोलीस भरती, मग आता ‘महाजेनको’मधील भरती परीक्षेचा पेपर फुटला ! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

मुंबई /  राज्यात मागील काही स्पर्धा परीक्षांची पेपर फुटत असल्याचे समोर आले होते. त्यानंतरही थांबण्याची चिन्हे नाहीत. महानिर्मितीमधील पदभरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा दावा करण्यात येत आहे.  महानिर्मितीमधील भरती परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. पेपरफुटीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या पेपरफुटीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिकाचे बटन कॅमेराने काढलेले फोटो समोर आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे.

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. त्यांच्याकडे ऊर्जाचे खाते आहे तर आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पेपरफुटीचे मागे कोणते रॅकेट काम करत आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 19 ते 22 जून दरम्यान महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकालही जाहीर झाला. आयबीपीएसनी ही परीक्षा घेतली होती. समितीने सांगितले की, याबाबत १3 ऑगस्टला पेपर फुटल्याचे सांगितले होते. काही मुलांची नावेसुद्धा दिली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र काहीच चौकशी केली नाही. आज आम्हाला पुरावा सापडला आहे. आता तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करा आणि लवकरात लवकर पेपरफुटीवर कायदा निर्माण करा. नाहीतर देवेंद्र  फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

जालनामध्ये कोतवाल परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस

जालना शहरातील एका परीक्षा केंद्रावर कोतवाल पदाच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात मायक्रोफोनसह मोबाईल डिव्हाईस द्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवून तिचे उत्तरे सोडून घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 5 जणांना अटक केलं आहे. जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 69  जागांची 19 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरू होती. शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी परीक्षा घेण्यात आली. त्याच परीक्षेदरम्यान पोलिसांना गैरप्रकाराची गुप्त माहिती मिळाली त्या नुसार परीक्षा केंद्र प्रमुखाने तपासणी केली असता हा सर्व प्रकार निदर्शनास आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments