Wednesday, January 14, 2026
HomeAll India Government Jobsनीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मेगा ब्लॉक नाही

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मेगा ब्लॉक नाही

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मेगा ब्लॉक नाही

 

मुंबई/ राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांच्यामार्फत रविवार, ४ मे २०२५ रोजी National Eligibility cum Entrance Test (UG) – 2025 ही परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी मुंबईच्या बाहेरील आहेत आणि त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर विनाअडथळा पोहचण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुंबई शहर यांनी रेल्वे प्रशासनास रविवार ४ रोजी कोणताही मेगा ब्लॉक ठेऊ नये असे कळविले होते. त्यानुषंगाने, रेल्वे प्रशासनाने ४ रोजी सेंट्रल, हार्बर व वेस्टर्न रेल्वे या तीन मार्गांवर कोणताही मेगा ब्लॉक नसल्याचे कळविलेले असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.नीट परीक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी https://cr.indianrailways.gov.in/  या लिंकवरून रेल्वेचे वेळापत्रक पाहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments