Wednesday, January 14, 2026
HomeAll India Government Jobsसाहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली/ साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, उर्दू आणि तेलुगू या भाषांमध्ये अनुवादित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो.हे पुरस्कार एका दिमाखदार समारंभात प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये आणि ताम्रपट असे आहे.

साहित्य अकादमी यांनी भारतीय अनुवादकांना, त्यांच्या हितचिंतकांना आणि प्रकाशकांना २०२५ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी मान्यताप्राप्त सर्व २४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित पुस्तके सादर करण्याचे आमंत्रण दिले आहे. २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये (म्हणजे १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान) प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.प्रत्येक पुस्तकाच्या १ प्रतीसह अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. पुरस्काराची सविस्तर माहिती,  www.sahitya-akademi.gov.in  या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments