Wednesday, January 14, 2026
Homeचालू घडामोडीसरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

ज्युनिअर इंजिनीअर, अधिकारी पदांसाठी 1550 हून अधिक पदांवर  भरती

विशेष म्हणजे केंद्र सरकारपासून  ते राज्य सरकारपर्यंत तरूणांसाठी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे, या सगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया याच महिन्यापासून सुरु झाली आहे आणि याच महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील आहे. यामध्ये BOI, SSC,UPMRC सह अन्य विभागातील विविध पदांसाठी भरती निघाल्या आहेत.

 कर्मचारी निवड आयोगामध्ये भरती

कर्मचारी निवड आयोगा या विभागामध्ये अनेक पदांसाठी भरती निघाल्या आहेत. SSC JE साठी जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तरी ती भरती प्रक्रिया येथे होणार आहे. या ठिकाणी ज्युनियर इंजिनीअरच्या पोस्टसाठी 968 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी एसएससीने अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ही प्रक्रिया 28 मार्चपासून सुरु झाली आहे. तर, 18 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना SSC ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरी 

बँक ऑफ इंडियामध्ये देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या ठिकाणी विशेष अधिकारी पदाच्या 149 जागांसाठी भरती निघाली आहे. जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी 27 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवार 10 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल ते bankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

UPMRC भर्ती 2024 UP मेट्रो मध्ये भरती

उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये देखील भरती निघाली आहे. यूपी मेट्रोमध्ये 439 कार्यकारी आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नोकऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 20 मार्चपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 19 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. अर्जाशी संबंधित संपूर्ण तपशील imrcl.com वर पाहता येतील.

TNPSC CCSE 1 रिक्त जागा : ग्रूप वन भरती 

तामिळनाडू लोकसेवा आयोग (TNPSC) ने एकत्रित नागरी सेवा परीक्षा 1 (गट एक सेवा) साठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी tnpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments