बँक ऑफ इंडियामध्ये 142 पदांसाठी भरती
बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून स्केल IV पर्यंत विविध स्ट्रीममध्ये अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत ते उमेदवार BOI bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाईटद्वारे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. स्केल IV च्या अंतर्गत 142 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 10 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
BOI भर्ती 2024 पात्रता काय असावी?
जे उमेदवार खाली दिलेल्या निकषांद्वारे पात्र असतील ते उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी भरती 2024 साठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचं वय 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे. उमेदवारांचा जन्म 2 फेब्रुवारी 1989, च्या आधी आणि 1 फेब्रुवारी 1999 च्या नंतर नसावा.
शैक्षणिक पात्रता
बॅंक ऑफ इंडियामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
अधिकारी पदाच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल किंवा वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत इंग्रजी भाषेशी संबंधित प्रश्न, पोस्टशी संबंधित व्यावसायिक ज्ञान आणि बँकिंग उद्योगाच्या विशेष संदर्भात सामान्य जागरूकता यांचा समावेश असेल. इंग्रजी भाषा चाचणी वगळता वरील चाचण्या द्विभाषिक स्वरूपात, म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असतील. इंग्रजी भाषेची चाचणी ही पात्रतेची असेल म्हणजेच गुणवत्ता यादी तयार करताना इंग्रजी भाषेत मिळालेले गुण गणले जाणार नाहीत.
अर्ज फी
सर्वसाधारण आणि इतरांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आणि SC/ST/PWD साठी रुपये 175 निश्चित केले आहे. फक्त मास्टर/व्हिसा/रुपे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड/मोबाईल वॉलेट, QR किंवा UPI वापरून पेमेंट केले जाऊ शकते.
अर्ज कसा करावा?
- अधिकारी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सर्वात आधी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला https://bankofindia.co.in/. भेट द्यावी.
- यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवरील “Career” किंवा “Recruitment” या सेक्शनच्या लिंकवर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्ही “New Ragistration” किंवा “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
- त्यानंतर अर्ज फी भरा.
- आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.
