पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत ‘३२७’ जागांवर नोकरीची संधी!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत सध्या ‘सहायक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ अशा पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. या पदांवर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीचे पात्रता निकष, अर्जाची प्रक्रिया तसेच अर्जाची अंतिम तारीख काय आहे याबद्दल माहिती पाहा.
पद आणि पदसंख्या
मराठी माध्यम –
सहायक शिक्षक – १५१ जागा
पदवीधर शिक्षक – ९४ जागा
मराठी माध्यम एकूण पदसंख्या – २४५
हिंदी माध्यम –
सहायक शिक्षक – ५ जागा
पदवीधर शिक्षक – ११ जागा
हिंदी माध्यम एकूण पदसंख्या – १६
उर्दू माध्यम –
सहायक शिक्षक – ३३ जागा
पदवीधर शिक्षक – ३३ जागा
उर्दू माध्यम एकूण पदसंख्या – ६६
मराठी, हिंदी व उर्दू माध्यम मिळून एकूण ३२७ पदांवर भरती होणार आहे.
PCMC Shikshak recruitment 2024 – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकृत वेबसाईट –
https://www.pcmcindia.gov.in/marathi/
PCMC Shikshak recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1yBdWU7ffvN22bGl9JJ-q_lEaluhiSRxz/view
शैक्षणिक पात्रता
सहायक शिक्षक
या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे उच्च माध्यमिक – डी.एड्. पदवी असणे आवश्यक आहे.
पदवीधर शिक्षक
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय) पदवी असावी
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडे एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय) पदवी असावी
अर्ज आणि अर्जाची प्रक्रिया
‘सहायक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरताना उमेदवाराने आवश्यक ती सर्व माहिती भरावी.
भरलेली माहिती योग्य आणि अचूक असल्याची खात्री करावी.
नोकरीचा अर्ज पाठविताना त्यासह आवश्यक तेवढी सर्व कागदपत्रे जोडणे उमेदवारासाठी अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज उमेदवाराने अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १६ एप्रिल २०२४ अशी आहे.
नोकरीचे ठिकाण हे पिंपरी-चिंचवड असेल याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
‘सहायक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांच्या नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त माहिती हवी असल्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.
